फ्लिपकार्टचा लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपला नवीन ‘बिलियन कॅप्चर प्लस’ नावाचा स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. १५ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरू होणार आहे.

‘बिलियन कॅप्चर प्लस’ या फ्लिपकार्टच्या येऊ घातलेल्या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा असून कॅमेरामध्ये सुपर नाइट मोड, बोख इफेक्ट आणि डेप्थ ऑफ फिल्डसारखे अद्ययावत फिचर्स आहेत. परंतु हे कॅमेरे किती मेगापिक्सल आहेत हे अजन फ्लिपकार्टने गुलदस्त्यात ठेवलेले आहे. काही मिनिटं चार्जिंग केल्यावरच या फोनची बॅटरी बराच वेळ चालेल, असं कंपनीने सांगितले आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले असून लेटेस्ट ‘अँड्रॉइड नगेट’वर असणार आहे. तसेच क्लाउड स्टोरजमध्ये आता युजर्सना जास्त डेटा सेव्ह करता येणार आहे.

हा स्मार्टफोन अनेक सक्षम फिचर्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या फोनबाबत अनेक गोष्टी अद्याप कंपनीने उघड केलेल्या नाहीत. आता हा फोन ग्राहकांच्या किती पसंतीस पडतोय हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.