‘आयफोन एक्स’वर अॅपल कमावते इतका नफा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या आकर्षक फिचर्समुळे ‘आयफोन एक्स’ने बाजारात धुमाकुळ घातला आहे. लोक रात्रभर लाईनमध्ये उभे राहून हा फोन विकत घेत आहेत. हिंदुस्थानात ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत ८९००० रूपये आहे. तर, २५६ जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत १,०२,००० रूपये आहे.

पण या एका फोनवर अॅपलला किती फायदा होतोय, हे ऐकल्यावर नक्कीच धक्का बसेल… रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘आयफोन एक्स’च्या ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेला फोन बनवण्यासाठी २३,२५० रूपये इतका खर्च कंपनीला आला आहे. म्हणजेच एका फोनवर सुमारे ६४ टक्के नफा कंपनीला मिळतो.

टेक इनसाइटच्या रिपोर्टनुसार, या फोनमधील सगळ्यात महागडा पार्ट म्हणजे ५.८इंचाचा OLED डिस्प्ले आहे. ज्याची किंमत अंदाजे ६५.५० डॉलर म्हणजेच ४२०० रूपये आहे.

‘आयफोन एक्स’ची वैशिष्ट्ये –

डिस्प्ले – ५.८० इंच
बॅटरी – २७१६ एमएएच
प्रोसेसर – हेक्सा-कोर
फ्रंट कॅमेरा – ७ मेगापिक्सल
रेझॉल्यूशन – ११२५ x २४३६ पिक्सल
रॅम – ३ जीबी
ऑपरेटींग सिस्टिम – आईओएस ११
स्टोरेज – ६४ जीबी
रियर कॅमरा – १२ मेगापिक्सल