प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीला न्यायालयाचा दणका, मोबाईलसोबत चार्जर न दिल्याने 82 हजारांचा फटका

एका स्मार्टफोन कंपनीला ग्राहकाला फोनसोबत चार्जर न देणे चांगलेच महागात पडले आहे. ग्राहक न्यायालयाने त्या ग्राहकाला 82 हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी प्रिमियम स्मार्टफोन ब्रॅण्ड अॅपल कंपनीने आयफोन विकताना सोबत चार्जर न देण्याचा निर्णय घेतला होता.. आयफोन खरेदी केल्यानंतर वेगळा आयफोन खरेदी करावा लागतो. कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्स नाराज आहेत. मात्र तरीही कंपनी त्यांच्या निर्णयावर ठाम होती. मात्र नुकतेच अॅपल कंपनीला चार्जन न दिल्यामुळे 82 हजारांचा फटका सहन करावा लागला आहे. ब्राझीलचे न्यायाधिशांनी स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपलला आदेश दिला आहे की आपल्या ग्राहकाला एक हजार डॉलर नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार.

टेकमुंडोमधील वृत्तानुसार, ब्राझीलमधील गोयानियाच्या 6 व्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वेंडरलेई कॅरेस पिनहेरो यांनी हा निकाल दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयफोन चार्जरशिवाय विकणे त्यांच्या ग्राहक कायद्याविरोधात आहे. त्यामुळे अॅपल कंपनीला त्या ग्राहकाला 82 हजार 139 रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी अॅपल कंपनीने आपली बाजू मांडताना म्हंटले की, बहुतेक आयफोन ग्राहकांकडे आधीपासूनच चार्जर असतो आणि अशा परिस्थितीत प्रत्येक नवीन आयफोनसह चार्जर विकणे आमच्यासाठी योग्य नाही आणि ते पर्यावरणाच्या दृष्टीनेही हानिकारक देखील असू शकते. स्मार्टफोन ब्रँडचे म्हणणे आहे की, आयफोनसह चार्जर न विकल्याने ते केवळ ई-कचरा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या निर्णयामुळे अॅपलचेही बरेच पैसे वाचणार आहेत. परंतु, ब्राझीलच्या या प्रकरणावर अॅपलने पैसे देणार की नाही याबाबत काहीही सांगितलेले नाही.  याशिवाय ब्राझील कोर्टाच्या बाजूनेही काहीही समोर आलेले नाही.