तेज प्रतापच्या बॉडिगार्डची कॅमेरामनला मारहाण

14

सामना ऑनलाईन । पाटणा

लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याच्या बॉडिगार्डने एका कॅमेरामॅनला मारहाण केली आहे. तसेच या बॉडिगार्डने पत्रकारांना देखील धक्काबुक्की केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तेज प्रताप यादववर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

तेज प्रताप यादव पाटणा येथील केंद्रावर मतदान करून बाहेर पडत असताना फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी त्यांची कारच्या पुढे आलेल्या एका कॅमेरामनमुळे गाडीचा आरसा तुटला. त्यामुळे संतापलेल्या बॉडिगार्डने त्या कॅमेरामनला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तेज प्रतापवर टीका होत आहे. टीका सुरू होताच तेज प्रतापने एअरपोर्ट पोलीस ठाण्यात त्याच्या जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या