अंधश्रद्धेचा कहर, लकी तारखेला तेलंगणा विधानसभा भंग करण्याचा निर्णय

20

सामना ऑनलाईन, हैद्राबाद

के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तिथे मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत. निर्णय घेतल्यानंतर तातडीने राव यांनी  राज्यपाल इ.एस.एल. नरसिम्हन यांची भेट घेतली आणि विधानसभा भंग करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणीही केली आहे.

६ आकडा हा लकी असल्याने तिथले मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आजच्याच दिवशी हा निर्णय घेण्याचं निश्चित केलं होतं. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतला देखील. विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विधानसभा भंग करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ मे 2019 पर्यंत आहे. मात्र राव यांची इच्छा होती की तेलंगणाच्या निवडणुका या वर्षाअखेर चार राज्यात होणाऱ्या निवडणुकांसोबत व्हाव्यात, यासाठीच त्यांनी विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या