भाविकांच्या टेम्पोला जळगावनजिक अपघात,  दोन ठार, २४ जण जखमी

21

सामान ऑनलाईन । जळगाव

भाविकांच्या टेम्पोला जळगावजवळ अपघात झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नवस फेडण्यासाठी हे भाविक सावखेड्याला निघाले होते.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आंबेवड गावाजवळ भाविकांना घेऊन निघालेला टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. या भीषण अपघातात टेम्पो चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेले २४ भाविक जण शेंदूर्णी गावातील रहिवासी आहेत. ते नवस फेडण्यासाठी टेम्पोतून सावखेड्याला निघाले होते.

या अपघातील जखमी भाविकांवर जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव समजू शकले नाही. या घटनेमुळे शेंदूर्णी गावात शोककळा पसरली आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या