केनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू

4

सामना ऑनलाईन । नैरोबी 

केनियाची राजधानी नैरोबीमधील वेस्टलँड भागात एका पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. सोमालियाच्या अल शबाब दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या हॉटेलमध्ये 101 खोल्या असून या भागात अनेक हॉटेल आणि कार्यालय आहेत. स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा हल्ला झाला. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी पार्किंगमधल्या गाड्या स्फोटकं लावून उडवून दिल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकधारी चार दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर लोकांची धावपळ करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्यावर गोळ्या आणि विस्फोटकं होती.