कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला

1

सामना प्रतिनिधी । श्रीनगर 

कश्मीमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर हँड ग्रेनेड टाकून हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाल चौकात हा हल्ला झाला असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दहशतवाद्यांनी शुक्रवारी लाल चौकातील घंटाघर येथे सीआरपीएफ च्या बंकरवर एक ग्रेनेड फेकला.

हा ग्रेनेड रस्त्याच्या कडेला जाऊन फूटला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. परंतु तिथल्या एक गाडीचे नुकसान झाले. बुधवारी एका पोलीस कर्मचार्‍यावर ग्रेनेड फेकला गेला त्यात तीन पोलीस जखमी झाले.

दक्षिण कश्मीरमध्येही शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकला. त्या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही अथवा कुठलेही नुकसान झालेले नाही.