26/11 मुंबई हल्ल्यात याच पूलावरून कसाबने केला होता गोळीबार

70

सामना ऑनलाईन । मुंबई

सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक एकला जोडणारा पूलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळला. हा पूल 26/11 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा मूक साक्षीदार होता. सीएसएमटी स्थानकात अंदाधूंद गोळीबार केल्यानंतर दहशतवादी अजमल कसाबने या पूलावरून गोळीबार केला होता. तसेच हँड ग्रेनेडही फेकले होते. हल्ला केल्यानंतर कामा रुग्णालयाच्या दिशेने पळून जाण्यासाठीही त्याने याच पूलाचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती दिली होती. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर आपण रस्त्यावरच थांबलो होतो. त्यावेळी एक दहशतवादी या पूलावर आला. त्याने अंदाधुंद गोळीबार करत हँड ग्रेनेडही फेकले. त्यानंतर या पूलावरून दुसऱ्या बाजूला जात दहशतवाद्याने पलायन केले. त्यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने दहशतवाद्याचा फोटोही काढला होता. तो कसाब असल्याचे उघड झाले होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीदरम्यान या फोटोचा पुरावा म्हणून वापर केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या