मुंबई विमानतळावर ‘लष्कर ए तोयबा’च्या दहशतवाद्याला बेड्या

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विमानतळावर ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत सलीम खान याला बेड्या ठोकल्या आहेत. सलीम खान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूरचा रहिवासी आहे.

उत्तर प्रदेश दहशवादविरोधी पथक २००८ पासून सलीम खानच्या शोधावर होते. सलीमने कौसर आणि शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानममधील मुजफ्फराबाद येथील लष्कर ए तोएबाच्या कॅम्पमध्ये २००७ साली प्रशिक्षण घेतले होते. सलीमने ‘लष्कर ए तोयबा’ आणि आयएसआय एजंट आफताबसाठी हेरगिरी करणाऱ्यांना आर्थिक रसद पुरवली होती.

सलीमविरोधात उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने लूक आऊट नोटीस जारी केली होती. त्याआधारे मुंबईला परत आल्यावर सलीमला अटक करण्यात आली. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक सलीमची कसून चौकशी करत आहे.