ब्रेकिंग – जम्मू कश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, पाच जवान शहीद

30

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतावाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केला असून या गोळीबारात पाच जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात एक स्थानिक महिला देखील जखमी झाल्याचे समजते घटनास्थळी दहशतवादी व जवानांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. या चकमकीनंतर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील के पी रोडवर सीआरपीएफच्या ताफ्यावर बाईकवरून आलेल्या दोन बुरखाधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. उल उमर मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या