बापरे! अमेरिकेत महिलेने एकाचवेळी दिला 6 मुलांना जन्म

सामना ऑनलाईन । वॉशिंगटन

अमेरिकेतल्या टेक्सास येथील होस्टनमधल्या एका महिलेने एकाचवेळी 6 मुलांना जन्म दिला आहे. 6 मुलांमध्ये 4 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. थेलमा चेका असे या 6 मुलांना जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे. बाळंतीण आणि तिची 6 बालके ही सुखरुप असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

‘द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास’ रुग्णालयात शुक्रवारी म्हणजेच 15 मार्च रोजी थेलमाने पहाटे 4.50 ते 4.59 दरम्यान तब्बल 6 मुलांना एकाचवेळी जन्म दिला. थेलमाने यातील दोन मुलींचे झीना आणि झुरियल असे नामकरण देखील केले आहे.  मात्र 4 मुलांची नावं अजून ठेवलेली नाही. जगभरात 4.7 अब्ज महिलांमध्ये अशी एखादीच महिला असते जी एकाचवेळी 6 मुलांना जन्म देते असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णालयाने सर्व बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.