आया रे, आया रे सबका बाप रे…अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर धमाका

243

सामना प्रतिनिधी । मुंबई

वांद्रय़ाच्या ताज लॅण्डस् एण्ड येथील शानदार सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘ठाकरे’ या सिनेमातील दोन हिंदी आणि एका मराठी गाण्याचे शनिवारी लाँचिंग करण्यात आले. ‘आया रे आया रे, सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे’ या गाण्याची जादूच अशी झाली की, लाँचिंगनंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर या गाण्याला लाखो हिटस् मिळाले. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलरलाही नेटकऱयांनी असेच डोक्यावर घेतले होते. ‘ठाकरे’ नावातच ताकद आहे.

या शानदार सोहळय़ाला सौ. रश्मी ठाकरे, चित्रपटाचे निर्माते शिवसेना नेते खासदार संजय र ाऊत, बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, माँसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता राव, संगीतकार रोहन- रोहन, गायक नकाश अझीझ आणि अवधूत गुप्ते, गीतकार मनोज यादव, मंदार चोळकर, वायकॉम 18 चे सीईओ अजित अंधारे, बिझनेस हेड निखिल साने, कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीकांत भसी, वर्षा राऊत, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत, विधिता राऊत आदी उपस्थित होते.

…म्हणून ‘ठाकरे’ सिनेमा बनवला!
शिवसेनाप्रमुखांना त्यांचे आत्मचरित्र लिहिण्याविषयी विचारले होते तेव्हा ते म्हणायचे, ‘मेरी जिंदगी तो खुली किताब है। जे लिहू ते सर्वच जनतेला ठाऊक आहे, मग आत्मचरित्र का लिहायचे?’ मात्र आजकाल सर्वच जण वाचतात कमी आणि पाहतात जास्त म्हणूनच हा सिनेमा तयार करण्याचे ठरवले, असे निर्माते संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. हिंदी सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अजिबात सापडला नाही. जिथे कैची होती तिथे आम्ही पण थोडी धार लावली, असेही राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगताच पत्रकारांमध्ये हशा उसळला. चित्रपटाचा आणि चित्रपटातील गाण्याचा निवडणूक प्रचाराशी संबंध जोडू नका असे सांगतानाच संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे हे राजकारणाच्या पलीकडचे व्यक्तिमत्त्व होते आणि हा बाळासाहेबांचा चरित्रपट आहे.

2019 मधला सर्वात मोठा सिनेमा
बाळासाहेबांसारख्या इतक्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वावर सिनेमा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. हा आमचा दहावा मराठी सिनेमा असून ‘ठाकरे’ हा 2019 मधला सर्वात मोठा सिनेमा ठरेल. इतर चरित्रपटांपेक्षाही हा वेगळा सिनेमा असून सिनेमाबद्दलची आमचीही उत्सुकता शिगेला पोहोचल्याची भावना वायकॉम 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केली. तर परदेशात जास्तीत जास्त क्रीनवर हा सिनेमा झळकेल, असे कार्निव्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भसी यांनी सांगितले.

2019 हे ठाकरेंचे – आदित्य ठाकरे
2019 हे ठाकरेंचे आहे. माझ्या पणजोबांनी बाळासाहेबांना एक वाद्य दिले होते. ते म्युझिक वाजवतील असे वाटले होते, पण त्यांनी म्युझिक वाजवले नाही, तर भल्याभल्यांची वाजवली. शिवसेनाप्रमुख हे देशाचे सुपरस्टार होते. या चित्रपटाची गाणी ऐकताना व ट्रेलर बघताना भावनाविवश झालो, असे शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

लॅण्डस् एण्डला भगवा साज
म्युझिक लाँच सोहळय़ानिमित्त हॉटेल ताज लॅण्ड्स एण्डच्या बॉलरूमला भगवा साज चढवण्यात आला. प्रवेशद्वाराजवळील बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे आणि कटआऊट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. गाण्यांवर ठेका धरण्यासाठी उपस्थित प्रत्येकाच्या हाती टाळ देण्यात आले. क्रीनवर ‘आया रे आया रे, सबका बाप रे’ हे गाणे सुरू होताच प्रेक्षकांनीही हातातील टाळ वाजवत ठेका धरला आणि गाणेही म्हणू लागले. गाण्याची जादूच अशी होती की ‘वन्स मोअर’ची मागणी झाली.

हे…आया आया देखो आया मसीहा सबके दील पे छाया है।
धरती, अंबर सारा समंदर दिखता उसका साया है।
फनकार है वो, दमदार है वो, अरे छुकर ना देखो अंगार है वो।
कहता है हर कोई सारे जमाने पे धाक रे….
आया रे आया रे आया रे सबका बाप रे…
अरे कहते है कहते है कहते है उसको ठाकरे….
दरपर जो उसके आए सवाली, खाली कभी वो ना जाता।
जो भी वो कहता है कर के दिखाता, वादा वो हर दम निभाता…
हातो में कंठी माला है उसके, अंदाज उसका निराला
सुरत ना देखे, देखे जरुरत, सबका है वो रखवाला…
दिलदार है वो, अरे ललकार है वो, सबके दिलो का सरदार है वो
कहता है हर कोई करने ना देगा वो पाप रे…
आया रे आया रे आया रे सबका बाप रे….
कहते है, कहते है, कहते है उसको ठाकरे….

  • ‘आया रे आया रे, सबका बाप रे’ हे गाणे डॉ. सुनील जोगी यांनी लिहिले असून नकाश अझीझ यांनी ते गायले आहे. तर ‘साहेब तू, सरकार तू’ हे मनोज यादव यांच्या लेखणीतून साकारलेले गाणे सुखविंदर सिंग यांनी गायले आहे.
  • ‘आपले साहेब ठाकरे’ हे मराठी गाणे मंदार चोळकर यांनी लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी त्याला स्वरसाज दिला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या