थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या १२ पैकी सहा मुलांची सुटका

1

सामना ऑनलाईन, बँकाँक

थायलंडमधील पूरग्रस्त थामलौंग गुहेत अडकलेल्या १२ मुले आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी रविवारी सकाळी १० वाजता पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली होती. १३ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि ५ थायलंड नौदलाचे पाणबुडे गुहेत पाठवण्यात आले. २३ जूनपासून ते गुहेत अडकले आहेत. आज मोहिमेदरम्यान ६ मुलांची सुटका करण्यात यश आले आहे.

अतिवृष्टीमुळे १० तासांसाठी मोहीम थांबवण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून इतर मुले आणि कोचची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुहेत ऑक्सिजनची कमतरता असल्याने अतिरक्ति सिलिंडर लावण्यात आले आहेत. स्वयंसेवकांनी या मोहिमेला ‘आता नाही तर कधीच नाही’ असे नाव दिले आहे.