डोंबिवलीकरांच्या हंड्यातील पाणी किती शुद्ध? पालिका करणार जल तपासणी

1
अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरिरावर अनेक अपायकार दुष्परिणाम होतात.

सामना प्रतिनिधी। डोंबिवली

डोंबिवलीकरांच्या नळाला येणारे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे आता उघड होणार आहे. पाण्याची तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासन ऑस्ट्रेलियन बनावटीची पाणी तपासणी यंत्रणा बसविणार आहे. इतकेच नव्हे तर यंत्रणेमुळे पाणीगळती, पाण्याचा दाब याची माहिती पाणीपुरवठा विभागाला ईमेल आणि मेसेजेसच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

डोंबिवली शहराला बारावे, नेतिवली, शहाड या पाणी शुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा होणाऱया पाण्यापैकी सुमारे 21 टक्के पाण्याची गळती होते. पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने दूषित पाणीही पिण्याच्या पाण्यात मिसळते. हे सर्व थांबविण्यासाठी महापालिका प्रशासन पाण्याची शुद्धता तपासणारे यंत्र बसविणार आहे. हे पाणी तपासणी यंत्र ऑस्ट्रेलियातील इव्होको वॉटर टेक्नॉलॉजी सिस्टीम या कंपनीचे आहे, असे स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. पाण्याची शुद्धता,पाइपलाइनची गळती याची अचूक माहिती देणार्‍या या यंत्राचे प्रात्यक्षिक येत्या 14 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या वतीने दाखविण्यात येणार आहे.