ठाणे पोलीसांनी २७ कोटी रुपयांचे ९ किलो युरेनियम केले जप्त, दोघेजण ताब्यात

27971

 

सामना ऑनलाईन । मुंबई

ठाणे पोलीसांच्या गुन्हा शाखेने दोघांजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांचे सुमारे ९ किलो युरेनियम (डिप्लेटेड युरेनियम) जप्त केले आहे. पोलीसांनी या कारवाईची बुधवारी माहिती दिली. या प्रकरणाचे धागेदोरे लांबवर गेलेले असून हे युरेनियम कोठून आणले याचा पोलीस कसून तपास करीत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून लगतच असलेल्या ठाणे शहरातून ८.८६ किलोग्रॅम युरेनियम जप्त करण्यात आल्यामुळे मुंबईतील सुरक्षा दलांना सर्व आस्थापनांना अतीदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील प्रख्यात भाभा अणुसंशोधन केंद्रात य़ा दोघांक़डे सापडलेल्या युरेनियमची तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे डिप्लेटेड युरेनियम असल्याचे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे.

हे दोघेजण सुमारे ९ किलो युरेनियम घेऊन ग्राहक शोधीत असताना पोलीसांच्या नजरेला पडले. त्यांनी हे युरेनियम तीन कोटी रुपये किलो दराने विकण्यासाठी ते ग्राहक शोधीत असताना पोलीसांनी त्यांना ताब्य़ाते घेतले. युरेनियम चोरी प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. युरेनियम विकणारे हे दोघे कोण याची माहिती पोलीसांनी उघड केलेली नाही. मात्र या व्यवहाराची गंभीरता ध्यानात घेता याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

नैसर्गिक युरेनियमपासून समृद्ध युरेनियम तयार कऱण्याच्या प्रक्रियेत शिल्लक राहाणारे युरेनियम डिप्लेटेड युरेनियम म्हणून ओळखले जाते. शत्रूंच्या चिलखती वाहनांचा भेद करण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या बुलेटसमध्ये डिप्लेटेड युरेनियमचा वापर केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या