’एमपीएससी’ची टंकलेखन चाचणी पुन्हा होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क सेवा मुख्य परीक्षा-2021 मधील टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात आली आहे. चाचणीची तारिख आणि वेळ नंतर कळवण्यात येणार आहे. लिपिक टंकलेखक आणि कर साहायक या संवर्गासाठी 7 एप्रिलला ही चाचणी घेण्यात आली होती. पण, या चाचणीवेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ही चाचणी पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. आयोगानेही विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. दरम्यान, नव्याने घेण्यात येणार्या चाचणीला अनुपस्थित उमेदवारांचा आणि चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही.