मुंबईच्या तलावांत नौकाविहार

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईचे वैभव असलेल्या पालिका क्षेत्रातील सर्व तलावांचे लवकरच सुशोभीकरण होणार असून नौकाविहाराची संधीही मिळणार आहे. स्थायी समितीत आज या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली. याबाबत शिवसेनेने पाठपुरावा केला होता. मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरात अनेक तलाक असून या तलावांमधील पाणी प्रदूषित झाले आहे. या तलावांमधील शेवाळ व केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण होतो. त्यामुळे पालिकेच्या तलाकांतील केरकचरा काढून त्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे व माफक शुल्क आकारून त्या ठिकाणी नौकाकिहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेला २८ ऑक्टोबर २०१३ ला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताक आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता.

मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार

शिवसेनेने मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला उत्तर देताना आयुक्तांनी मुंबई शहर, उपनगरातील पालिकेच्या अखत्यारीतील विविध तलाकांचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या तलाकांमध्ये माफक शुल्क आकारून नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला होता. याबाबतच्या प्रस्ताकाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांना तलाकांत आता नौकाविहाराची सुविधा उपलब्ध होणार असून मुंबईनगरीच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

तलावांमधील पाणीही शुद्ध करणार

मुंबई शहर आणि उपनगरातील पालिकेच्या अनेक तलावांच्या सुशोभीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. मागील वर्षी वांद्रे तलाव, शीव तलाव, मुलुंडमधील मोरया तलाव आणि भांडुपमधील शिवाजी तलाव या चार तलावांमधील पाण्याचे शुद्धीकरण यांत्रिकी आणि जैविक प्रक्रियेने करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील सर्व तलावांमधील पाण्याचे शुद्धीकरण करण्याचेही प्रशासनाच्या विचाराधीन आहे.