भाजपची उत्तर प्रदेशात पुस्तिका, डॉ. आंबेडकर यांची राज्यघटना म्हणजे इतरांची केवळ ‘कॉपी’च!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान म्हणजे इतर राष्ट्रांतील राज्यघटनांची उचलेगिरी आणि ‘कॉपी’च आहे, असे भाजपने उत्तर प्रदेशात काढलेल्या एका पुस्तिकेत म्हटले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भाजपने ‘सामान्य ज्ञान’ नावाची ७० पानांची पुस्तिका काढली आहे. या पुस्तिकेचे वाटप लाखो विद्यार्थ्यांना केले जात आहे. संविधानाच्या मसुदा समितीने आपल्या देशाला स्वतःची अभिजात अशी राज्यघटना दिलीच नाही, असेही त्या पुस्तिकेत नमूद केले आहे.