शेतीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

1

सामना प्रतिनिधी । राहाता

वडीलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला आहे. राहाता तालुक्यातील शिंगवे गावात गव्हाच्या शेतात ही घटना बुधवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे.

शिंगवे शिवारात गट नंबर ६३६ मधे सकाळी ९:३० ते १०:३०च्या सुमारास ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. रज्जाक बशीर शेख वय ६० हे शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पुतण्या मोहसीन यासीन शेख याने तेथे जाऊन चुलत्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले व तेथून पळून गेला. यात रज्जाक शेख हे घटनास्थळीच मयत झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी आरोपीचा माग काढण्यासाठी श्वान पथकही बोलविण्यात आले मात्र श्वान तेथेच घुटमळले.

मयताची पत्नी शबीरा रज्जाक शेख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलीसांनी आरोपी मोहसीन यासीन शेख याच्या विरूध्द भादवी कलम ३०२, ३०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास सपोनी विशाल पाटील हे करत आहेत.