शहापुरात पहिली सरकारी गोशाळा

सामना ऑनलाईन, खर्डी

महाराष्ट्रातील पहिल्या अद्यावत गोशाळेचे उद्घाटन  शहापुरात करण्यात आले आहे. या गोशाळेत बंदिस्त गोठा, खुला गोठा, चारा निर्मिती तसेच खाद्य साठवण सभागृह तयार करण्यात आले असून 50 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या गोशाळेतून  विविध उत्पादने घेऊन ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

गोसंवर्धनासाठी शासन प्रत्येक जिल्हाला 1 कोटी अनुदान राज्य सरकार देणार आहे. याचाच एक भाग म्हणून  महाराष्ट्रातील पहिल्या गोशाळेचा शुभारंभ शहापूर तालुक्यातील अघई येथे जंगली महाराज आश्रम ट्रस्टमध्ये पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला, या गोशाळेसाठी 50 लाख अनुदान देण्यात आले असून यामध्ये खुला गोठा, बंधिस्त गोठा, चारा निर्मिती, खाद्य साठकण हॉल याचा समाकेश आहे.

या कार्यक्रमासाठी जंगली महाराज ट्रस्टचे कार्याध्यक्ष उमेश जाधक, पशुसंकर्धन उपायुक्त  डॉ. रायककार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एल. डी. पकार, डॉ. दळकी, डॉ. रायबोले, डॉ. एस. के. पाटील, तसेच आत्मा मलिक इंजीनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य मनोज चक्हाण, शिकम भट यांच्यासहित अनेक मान्यकर  उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या