पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री परिषदेची पहिली बैठक

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची पहिली बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत नव्या सरकारच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार असून पाच वर्षांतील ऍक्शन प्लॅनवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नव्याने मंत्रिमंडळात येणाऱ्या सदस्यांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक विभागाच्या कामकाजाबाबत आणि राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शपथविधीनंतरच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तसेच शहीद जवानांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकसभेचे अधिवेशन पुढील आठवडय़ात सुरू होत आहे.  सदस्यांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी राज्यमंत्री सभागृहात पार पाडत असतात. हे लक्षात घेता राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या