मोबाईल ऍपद्वारे ‘लव्ह-लफडे’चे प्रदर्शन

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपट प्रदर्शित करणारे एचसीसी नेटवर्क हे पहिले मोबाईल ऍप ठरणार आहे. एचसीसी नेटवर्क लवकरच ‘लव्ह लफडे’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित करणार आहे.

उत्तम आशय, दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट अभिनय मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे केळ आणि पैसा. अवघे दोन टक्क्यांपेक्षा कमी लोक मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. या पार्श्वभूमीवर सदानंद इप्पाकायल यांच्या एचसीसी नेटवर्क कंपनीने ऍप तयार केले आहे. एचसीसी नेटवर्क म्हणजे होम सिनेमा कॅन्सेप्ट नेटवर्क. ऍपद्वारे वर्षातून चार ते पाच चित्रपट प्रदर्शित या व्यासपीठावर करण्याचा त्यांचा मानस आहे. चित्रपट पाहण्याचा कालाकधी हा तीन महिन्यांचा असेल, असे सदानंद इप्पाकायल यांनी सांगितले. दिग्दर्शक सचिन आंबात यांचा ‘लव्ह-लफडे’ चित्रपट लवकरच ऍपद्वारे प्रदर्शित होईल. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत काडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.