लोया प्रकरणाची सुनावणी आजपासून

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोहराबुद्दीन शेख चकमकीची सुनावणी करणारे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.

लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी काँगेस नेते तहसीन पुनावाला, पत्रकार बी. एस. लोणे आणि माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांनी याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेसुद्धा आरोपी होते, पण नंतर त्यांना आरोपमुक्त करण्यात आले.