Pulwama Attack जम्मू कश्मीरमध्ये बॉम्ब निष्क्रीय करताना स्फोट, एक जवान शहीद

28 फेब्रुवारीपासून चित्रेश लग्नासाठी सुट्टीवर येणार होते.

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पुलवामात 40 जवान शहीद झाल्याची जखम ताजी असतानाच राजौरी जिल्ह्यात एक स्फोट झाला आहे. या स्फोटात लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लावलेले निष्क्रीय करताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटात मेजर चित्रेश सिंग शहीद झाले. मेजर चित्रेश सिंग हे मूळचे उत्तराखंडमधील डेहराडून येथील असून त्यांचे येत्या 5 मार्च रोजी लग्न होणार होते.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषपासून तब्बल दीड किलोमीटर आत जवानांनी हे बॉम्ब पेरले होते. दहशतवाद्यांनी बॉम्ब लावल्याचे समजताच मेजर चित्रेश सिंग यांच्या अध्यक्षतेखालील बॉम्ब स्क्वॉड तेथे पोहोचले. मेजर चित्रेश सिंग यांनी एक बॉम्ब निकामी केला. मात्र दुसरा बॉम्ब निकामी करत असताना त्या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात चित्रेश सिंग यांच्यासह दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.