सेन्सेक्सचा रेकॉर्ड

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजाराने मंगळवारी बाजार उघडताच मोठी उसळी घेत नवा रेकॉर्ड नोंदवला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७० अंकांची वाढ होऊन त्याने पहिल्यांदाच ३४ हजारांचा टप्पा पार केला आणि तो ३४ हजार ५ अंकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही २२ अंकांची वाढ होऊन तो १० हजार ५१५ अंकावर उघडला.

कशामुळे बाजारात तेजी
स्थानिक आणि संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केलेले शेअर्स आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ यांमुळे बाजारात तेजी आल्याचे अर्थतज्ञांनी म्हटले आहे.

– धातू उद्योग, औषधे, दूरसंचार, आरोग्य, बांधकाम उद्योग यांच्या शेअर्समध्ये २.२८ टक्क्यांनी वाढ झाली तर ब्ल्यू चिप्स कंपन्यांमधील भारती एअरटेल, सनफार्मा आणि येस बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २.५९ टक्क्यांनी वाढ झाली. कर्जाच्या पुनर्रचनेबाबत रिलायन्स कम्युनिकेशनने घोषणा करताच कंपनीच्या शेअर्समध्ये ३०.७८ टक्क्यांनी वाढ झाली.

– राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ५० व्यवहारांत १०,५०० झोनचा व्यवहार.

– रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, मारुती आणि आयटीसी कंपन्यांच्या शेअर बाजारातील तेजीमुळे निर्देशांक उसळला.