बंगळुरू ऐवजी विमान हैदराबादला उतरवलं, पण ते वाचले नाही

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मस्कत येथून बंगळुरू येथे निघालेलं एक प्रवासी विमान बुधवारी सकाळी अचानक हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. एका प्रवाशाची तब्येत अचानक ढासळल्याने हे विमान हैदराबाद येथे उतरवण्यात आलं. मात्र त्या प्रवाशाचे प्राण वाचवण्यात यश आले नाही.

बुधवारी सकाळी मस्कतहून निघालेले डब्ल्यूवाय८११ हे विमान बंगळुरूला निघाले होते. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका ६३ वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले. अखेर हैदराबाद येथे विमान उतरवण्यात आलं. त्यांना आरजीआयए या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.