रिलायन्स ग्रूपकडून 14 महिन्यांत 35,400 कोटींच्या कर्जाची परतफेड

42

सामना ऑनलाईन । मुंबई

रिलायन्स ग्रुपने मागील 14 महिन्यांत मालमत्ता विकून 35,400 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली, अशी माहिती या ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी मंगळवारी दिली. उर्वरित कर्जाचीही वेळेवर परतफेड केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिलायन्स ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ग्रुपमधील कंपन्यांचे मूल्य 65 टक्क्यांनी घटले आहे. याचदरम्यान अंबानी यांनी कर्ज परतफेडीबाबत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिल 2018 ते मे 2019 पर्यंत रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इफ्रा व संबंधित कंपन्यांचे जे कर्ज फेडले आहे. त्यात मूळ रक्कम 24,800 कोटी रुपये आणि 10,600 कोटी रुपये इतके व्याज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज काढले नसल्याचेही अंबानी यांनी स्पष्ट केले. आपल्या ग्रुपच्या कंपन्यांना विविध माध्यमांतून 30,000 कोटी रुपये येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या