नीरव मोदीला लंडन न्यायालयाचा पुन्हा दणका, चौथ्यांदा जामीन नाकारला

140

सामना ऑनलाईन । लंडन

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीला पुन्हा एकदा लंडन न्यायालयाने दणका दिला आहे. नीरव मोदीचा जामीनाचा अर्ज पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे.

‘नीरव मोदी हा त्याच्याविरोधातील पुरावे नष्ट करू शकतो, तसेच खटल्यात बाधा येईल असे प्रकार त्याच्याकडून केले जाऊ शकतात त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात येत आहे’, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधींचा घोटाळा केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वडस्वर्थ कारागृहात आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याआधी तीन वेळा त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या