अनुष्कानंतर आलियाही बनली ‘स्टाईल क्रॅकर’

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड स्टार्सप्रमाणे आपणही दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यांच्यासारखे ट्रेंडी लुक मिळवणे हे काही सोपे काम नाही. पण प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना वालावलकर यांनी हे काम सोप केले असून मुंबई पुण्यातील तरुणांसाठी ‘स्टाईल क्रॅकर’ नावाचा ब्रँड बाजारात आणला आहे. सध्या मुंबईकर तरूणांच्या यावर उड्या पडत असून लवकरच हा ब्रँड पुण्यात दाखल होत आहे. यासाठी कोरेगाव पार्क येथे १३ व १४ जानेवारीला नाईट मार्केटच आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूड स्टार्सप्रमाणे हटके लुक मिळवण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही सज्ज झाले आहेत.

अनुष्का शर्माने नुश ब्रँडद्वारे फॅशनच्या दुनियेत पदार्पण केल्यानंतर आता आलियाही ‘स्टाईल क्रॅकर’ या ब्रँडची भागीदार झाली आहे. या नाईट मार्केटमध्ये अनेक ब्रॅंड्सचे कपडे तसेच मनोरंजन, वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याशिवाय बरेच सरप्रायझेसही पुणेकरांसाठी असणार आहेत.