धक्कादायक! 24 वर्षात ‘या’ महिलेने दिला 44 मुलांना जन्म

4

सामना ऑनलाईन । कंपाला

युगांडामधील एका 39 वर्षीय महिलेने गेल्या 24 वर्षात तब्बल 44 मुलांना जन्म दिला आहे. मरिअम मबातांझी असे त्या महिचे नाव असून तिचे वयाच्या 12 व्या वर्षीच लग्न झाले होते. वयाच्या 36 व्या वर्षी ती शेवटची गरोदर होती.

मिरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार, मरियमचे नौशाद सोबत वयाच्या 12 व्या वर्षी लग्न झाले होते. त्यानंतर पहिल्याच वर्षी मरियम गरोदर राहिली व तिला जुळी मुलं झाली. मरियमने वयाच्या 36 वर्षापर्यंत तीन वेळा एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. चार वेळा तिने तिळ्यांना जन्म दिला. तर तब्बल सहा वेळा तिला जुळी मुलं झाली आहेत. मरियमची तीन वर्षापूर्वी प्रसूती झाल्यानंतर तिचा पती तिला सोडून गेला असून सर्व 44 मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवर आहे. मरियम ही सध्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भंगार विकून तसेच काही छोटी मोठी कामे करून पैसे कमवत आहे. त्यात आता तिची मोठी मुलं देखील तिला पैसे कमवायला मदत करतात.

‘मरियमचे गर्भाशय हे मोठे असल्यामुळे तिच्या गर्भात एकापेक्षा जास्त गर्भ तयार होतात. त्यामुळे तिने कायम चार, तीन किंवा दोन मुलांना एकत्र जन्म दिला आहे, असे मरियमच्या डॉक्टरने सांगितले.