अंबड : भरदिवसा घरफोडी, ग्रामसेवकाच्या घरातून साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

theft cirme
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । अंबड

भरदिवसा अज्ञात चोरटयाने ग्रामसेवकाच्या घरात प्रवेश करुन कपाटामध्ये ठेवलेला 3 लाख 65 हजार 600 रुपयांचा एैवज लंपास केल्याची घटना गुरुवारी शहरातील शारदा नगर येथे घडली. या चोरीप्रकरणी अंबड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक राजु प्रल्हाद कुरंगळ हे त्यांच्या पत्नीसह शहरातील शारदा नगर येथे राहतात. त्यांची पत्नी शहरातील लिटील स्टार शाळेवर शिक्षका म्हणुन काम करतात. त्या सकाळी 9 वाजता शाळेवर गेल्या व त्यांचे पती ग्रामसेवक राजु कुरंगळ हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावुन नौकरीवर गेले होते. त्यानंतर ग्रामसेवक राजु कुरंगळ यांच्या पत्नी शाळेवरुन घरी असल्यानंतर त्यांना त्याच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले व मुख्य दरवाजाचे पण कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी घरामध्ये जाऊन पाहणी केली असता घरातील कपाटामध्ये त्यांनी ठेवलेला 3 लाख 65 हजार 600 चा एैवज ज्यात सोन्या चांदीचे दागिने असा 3 लाख 20 हजार 600 रुपयांचे व नगदी 45 हजारांचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे पती राजु कुरंगळ यांना बोलाऊन घेऊन सदरची घटना सांगितली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ग्रामसेवक राजु कुरंगळ यांच्या फिर्यादवरुन अज्ञात चोरटया विरुध्द कलम 454,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.डी.सोन्ने हे करीत आहेत.