जन्माष्टमीच्या दिवशीच ठाण्यात श्रीकृष्ण मंदिरात चोरी

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यातील प्राचीन गोवर्धन कृष्ण मंदिरात जन्मष्टमीच्या दिवशीच श्रीकृष्णाच्या मुर्तीसह मंदिरातील देवाचे दागिनेही चोरण्यात आले आहेत. माखनचोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीकृष्णाच्या १५० वर्षे जुन्या असलेल्या मंदिरातच चोरीची घटना घडली आहे. जन्माष्टमीनिमित्त मंदिरात उत्सवाची तयारी सुरू होती. त्यावेळी रात्री उशीरा श्रीकृष्णाची मुर्ती आणि दागिने चोरण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील गोवर्धन वैष्णव मंदिर हवेली या ठिकाणी देवळातील दागिने आणि पैसे चोरण्अयात आले आहेत. दानपेटीत जमा झालेली रोख रक्कम, पुजाऱ्याकडे असलेले नऊ लाख रुपये आणि दागिने असा सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे. मंदिरातील सीसीटीव्हीची यंत्रणा तोडू ही चोरी करण्नयात आली आहे.  मंदिरात पुजारी आणि त्यांची पत्नी राहत होते.