उपप्राचार्याच्या घरात चोरी; फिर्यादीच्याच पत्नीवर श्वानाचा संशय

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

रत्नपूरच्या महाविद्यालयातील उपप्राचार्य हे सकाळी महाविद्यालयाला गेले. त्यांची पत्नी लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ कार्यालयात गेली’ होती. यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून १ लाख ५५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना उघड होताच छावणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण वेâले. फिर्यादीच्या श्वान पत्नीवर भुंकल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, छावणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

मिटमिटा-पडेगाव परिसरात असलेल्या कासलीवाल तारांगणमधील एल-सेक्टरमध्ये सुभाष सोनाजी जिते (४२) हे रत्नपुरातील कोहिनूर महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी सकाळी रत्नपूरला गेले होते. तर त्यांची पत्नी ही लायसन्स काढण्यासाठी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरास लॉक लावून आरटीओ कार्यालयात गेली होती. जाताना तिने घराची किल्ली शेजारी राहणाऱ्या महिलेकडे दिली होती. दुपारी बाराच्या सुमारास जिते यांचा पुतण्या हा घरी आला. त्यावेळेस घर उघडे होते. घर उघडे असल्याने तो घरात जेवण करत बसला होता. दीडच्या सुमारास सुभाष जिते यांची पत्नी घरी आली असता त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी विचारणा केली असता घर उघडेच असल्याचे सांगितले.

जिते यांच्या पत्नीने घरातील कपाट उघडले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे श्वान पथकासह पोहोचले. श्वानाने चोरट्याचा माग काढत थेट जिते यांच्या पत्नीच्या अंगावर धावून गेला. मात्र जिते यांनी हट्ट करत छावणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणी महिला पोलीस नाईक गायकवाड यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पैसे हडप करण्यासाठी चोरीचा बनाव
जिते यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच सेक्टरमध्ये नागरिकांसह सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. यावेळी जिते यांच्या पत्नीने सुरक्षारक्षकाला पोलीस ठाण्यात फोन करण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी ठाण्यात येऊन तक्रार द्या, असा सल्ला दिल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत जिते यांची पत्नी जमलेल्या महिलांना चोरीला गेलेले पैसे आमचे नसून दुसऱ्याचे होते असे सांगत होती. त्यामुळे हा प्रकार पैसे हडपण्यासाठी असावा, अशी चर्चा पोलीस तसेच नागरिकांमध्ये सुरू आहे.