उदगीर येथे बंद घर फोडले; 4 लाखांचा ऐवज लांबवला

159

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर जिल्ह्यात घरफोड्यांच्या गुन्ह्यात सतत वाढ होत आहे. उदगीर शहरातील शाहू कॉलनी येथील बंद घर चोरट्यांनी फोडले. घरातून तब्बल 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रदीप गंगाधर जटाळ (वय 37, रा. शाहुपुरी कॉलनी, उदगीर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आपल्या पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी लातूरला गेले होते. 10 जून रोजी सकाळी 11 ते 11 जून रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा ऐवज पळवून नेला. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या