चटक मटक : कणसाचे ठेपले

 

साहित्य : ५०० ग्रॅम मक्याचे पीठ, १०० ग्रॅम तांदळाची पिठी, ओवा, जिरेपूड, तिखट, १ चमचा धनेपूड, हिंग, चवीनुसार मीठ, १ कप तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : सर्वप्रथम तांदूळ आणि मक्याच्या पिठाला एकत्र करून चाळून घ्यावे. त्यामध्ये सर्व मसाले टाकावेत. नंतर पिठात पाणी घालून ठेपले लावावेत. वर झाकण ठेवावे. तव्यावर मंद आचेवर ठेपले भाजावेत. खमंग भाजल्यावर टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.