जरा या आणि शिका, हेमा मालिनी यांचा रेखा आणि सचिन तेंडुलकरला सल्ला

60

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दांडी बहाद्दर खासदार अशी अभिनेत्री रेखा आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. हे दोघेही जण नामनिर्देशित खासदार असून त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत जेव्हा भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री  हेमा मालिनी यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या माझ्या मित्रांना सभागृहात येण्यासाठी प्रवृत्त केलं पाहीजे, मला असं वाटतं की इथे शिकण्यासारखं बरंच काही आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी या दोघांच्या उपस्थिती बाबत म्हटलं होते की या दोघांना सदनाच्या कामकाजात रस नसेल तर मग ते राजीनामे का देत नाहीत ? राज्यसभेतवर १२ नामनिर्देशित सदस्य पाठवले जातात, विविध क्षेत्रातील व्यक्तींची यासाठी निवड होत असते, त्यांचा त्या क्षेत्रातील असलेला अभ्यास किंवा वकूब लोकांच्या हितासाठी वापरला जावा हे त्यांच्याकडून अपेक्षित असतं. मात्र असं होताना दिसत नाहीये, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सचिन आणि रेखा फक्त एकच दिवस उपस्थित असल्याची नोंद आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या