रोहित आणि पत्नीचे संबंध चांगले नव्हते, रोहितच्या आईचा दावा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्व. नेते एन.डी.तिवारी यांचे सुपुत्र रोहित तिवारी यांचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. त्यात रोहितचे आणि त्यांच्या पत्नीचे संबंध चांगले नव्हते असे स्पष्टीकरण त्यांच्या आई उज्वला तिवारी यांनी दिले आहे. दोघांमध्ये लग्नाच्या पहिल्या दिवसांपासूनच भांडणे होत होती असे उज्वला तिवारी यांनी सांगितले आहे. पोलिसांकडून रोहित तिवारीच्या पत्नीची चौकशी सुरू आहे.

रोहित तिवारी हे बेशुध्दवस्थेत आपल्या घरात आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रोहितला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असून खून झाल्याचे स्पष्ट झाले. यावर त्यांच्या आई उज्वला तिवारी म्हणाल्या की,

 “रोहितचा खून होणे ही बाब खूपच दुर्दैवी आहे. रोहित मंगळवरी चार वाजेपर्यंत झोपला होता तर त्याला का उठवले नाही? रोहितचे  त्याच्या पत्नीचे संबंध चांगले नव्हते.” तसेच लग्नाच्या पहिल्या दिवसापासून दोघांमध्ये वाद होत होते असेही उज्वला तिवारी म्हणाल्या