कसली महागाई, कसली मंदी? कुठेही महागाई नाही – चंद्रकांत पाटील

सामना ऑनलाईन । जालना

एकीकडे नोटाबंदीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त असताना राज्याच्या महसूलमंत्र्यांनी महागाई आणि मंदीबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. महसूलमंत्र्यांच्या मते देशात कुठेही महागाई आणि मंदी नाही. ‘कसली महागाई आणि कसली मंदी?’ असे म्हणत महसूलमंत्र्यांनी कुठेही महागाई आणि मंदी नसल्याचे म्हटले आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज जालन्यात आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना मंदी आणि महागाईबाबत प्रश्न विचारला असता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशात असे चित्र नसल्याचे म्हटले आहे. उलट लोक कॅशलेस व्यवहारांकडे मोठया प्रमाणात वळले असून नोटाबंदीचा विपरीत परिणाम कुठेच दिसून येत नाही. उलट कॅशलेस व्यवहारांची लोकांना आता सवय लागल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.