शारिरीक शोषणाविरूद्ध तृतीयपंथीय वकीलाचा लढा

सामना ऑनलाईन, मुंबई

लाईक करा, ट्विट करा

पवन उर्फ पवित्रा यादव नावाचा एका तृतीयपंथीय वकील बनला आहे. पवन हा शारिरीक शोषणाचा बळी आहे, या अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी त्याने वकील बनण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारने किन्नरांना तृतीयपंथीयांचा दर्जा दिला. या आधारे एलएलबीसाठी प्रवेश घेणारी पवन उर्फ पवित्रा ही पहिला तृतीयपंथी ठरली आहे.

पवन १६ वर्षांचा असताना त्याच्या चुलत भावाच्या मित्राने त्याचं लैंगिक शोषण केलं होतं. राम अवतार यादव असं त्याचं नाव असून त्याने पवनचा व्हिडीओ देखील बनवला, या व्हिडीओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं. जवळपास ३ वर्ष हा प्रकार सुरू होता. पवनला जेव्हा कायद्याबाबत माहिती झाली तेव्हा त्याने तडक मालाड पोलीस स्टेशन गाठलं आणि राम यादव विरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी राम यादवला अटक केली मात्र ६ महिन्यानंतर तो जामीनावर सुटला. राम यादवला कठोर शिक्षा व्हावी ही पवनच्या मनात इच्छा होती. मात्र कायद्याचं ज्ञान नसल्याने हे शक्य होत नव्हतं आणि त्यामुळेच अखेर पवनने कायद्याची पदवी घेण्याचा विचार निश्चित केला.

कायद्याची पदवी घेतल्यानंतर इतर पिडीत तृतीयपंथीयांना न्याय मिळवून द्यायचा आहे अशी प्रतिक्रिया पवनने दिली आहे. या प्रवासात लक्ष्मी आणि गौरवी सावंत यांनी दिलेल्या सहकार्यामुळे मी ही पदवी घेऊ शकलो अशी पवनची प्रतिक्रिया आहे.