VIDEO: निफाडमध्ये 15 दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद

6


सामना ऑनलाईन । निफाड

निफाड तालुक्यात गोदावरी नदी किनारी असलेल्या गावांमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी पहाटे सावजाच्या शोधात असलेला एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. गेल्या 15 दिवसात एकाच जागी लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला हा तिसरा बिबट्या आहे.

निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील शिवाजी पांडुरंग दराडे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील गावांमध्ये बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत या ठिकाणी तीन बिबटे जेरबंद केले असले तरी, या परिसरात अद्याप एक बिबट्या असल्याचे शेतकरी व ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा अजून काही दिवस येथे ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या