शहरभर गर्लफ्रेंडचे होर्डींग्ज लावून घेतला ब्रेकअपचा बदला

सामना ऑनलाईन । जकार्ता

प्रेमात वेडं होणं जितके सोपं तितकंच प्रेमभंगातून बाहेर येणं अवघड. प्रेमभंगाचं दु:ख सगळ्यांनाच पेलवेल असं नाही. त्यातही मनाने खंबीर असलेल्या व्यक्ती त्यातून सहज बाहेर पडतात. पण काहीजण पार उद्धवस्त होता सूडाच्या भावनेने पेटून उठतात. अशा व्यक्ती काय करतील त्याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार इंडोनेशियामध्ये घडला आहे. प्रेमभंगामुळे नैराश्य आलेल्या एका प्रेमवेड्याने शहरात सावर्जनिक ठिकाणी प्रेयसीचे फोटो असलेले पोस्टर्स लावले. त्याखाली तू मला फसवलसं असं लिहून प्रेमभंगाचा राग व्यक्त केला आहे. या पोस्टर्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

girl-2

संबंधित तरुणाचे व तरुणीचे अनेक वर्षांपासून प्रेम होते. पण प्रियकर संशयी व रागीट असल्याने तरुणी त्याच्या स्वभावाला कंटाळली होती. यामुळे तिने त्याच्याशी बोलणे टाकले. प्रेयसीने बोलणेच बंद केल्याने प्रियकर अस्वस्थ झाला. त्याने तिला याबद्दल विचारले असता तिने आपली मैत्री संपल्याचे सांगत त्याला तिथून जायला सांगितले. प्रेयसीने केलेला ब्रेक अप प्रियकराच्या जिव्हारी लागला. त्यातूनच मग तिला अद्दल घडवण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्यानंतर त्याने भरमसाट पैसे खर्चंत शहरभरातील बिलबोर्ड भाड्याने घेतले. त्यावर प्रेयसीचा फोटो चिटकवत तू माझं हृदय तोडलंस. मला फसवलंस. पण आता मीचं तुझ्याबरोबरचं नाते तोडतोय, असं लिहिलं. शहरात जाहिरातींच्या जागी एका तरुणीचे फोटो व  त्याखाली प्रेमभंगाची वाक्य बघून नागरिकही हैराण झाले. काहीजणांना हा मालिकेशी संबंधित स्टंट असावा असे वाटले. पण होर्डींंग्जवर झळकणारी तरुणी ही मॉडेल नसून सामान्य घरातील तरुणी असल्याचे समोर आले. तसेच ब्रेक अप झाल्याने तिच्या प्रियकरानेच हे होर्डींंग्ज लावल्याची माहिती व तो तिची अडवणूक करत असल्याचे व्हिडीओ सोशल साईडवर व्हायरल झाले.