या अंधश्रद्धा नव्हेत

मंदिरात घंटा वाजवल्याने देव खूश होतो असं म्हणतात.
वास्तविक मंदिरांमधील घंटा ही तांब्याची बनवलेली असते. तांब्याची वस्तू वाजविल्यामुळे त्यातून निघणाऱ्या आवाजाने वातावरणातील विषाणू नष्ट होतात. याबरोबरच या आवाजाने त्या परिसरातील व्यक्तींच्या शरीरातील सातही केंद्रे कार्यान्वित होतात.

लिंबू-मिरची लावली तर वाईट नजरेपासून बचाव होतो.
खरं पाहता त्यामागे लॉजिक वेगळंच आहे. लिंबू-मिरचीमध्ये सायट्रिक ऑसिड मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आसपासचे कीडेकीटक घरात शिरत नाहीत.

रात्री नखं कापत नाहीत.
रात्री नखं कापत नाहीत हे खरं, पण तेव्हा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. त्यावेळी रात्री नखं कापली तर हात कापला जाण्याचा धोका होता. कारण नखं कापताना तेव्हा आतासारखे नेलकटर वापरण्याऐवजी धारदार शस्त्रे वापरली जायची.

जमिनीवर बसून जेवल्यास पूर्वज नाराज होतात.
वास्तविक जमिनीवर बसून जेवल्यामुळे पचनक्रिया चांगले काम करते आणि जेवण चांगले पचते, हे यामागे लॉजिक आहे.

मंगळवार आणि गुरुवारी केस धुणे चांगले नाही
जुन्या काळात लोक घरात मोठमोठ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवायचे. केस धुण्यासाठी जास्त पाणी लागते. किमान दोन दिवस तरी केस धुतले नाहीत तर पाणी वाचेल यासाठी तेव्हा दोन वार ठरवण्यात आले होते.

घराबाहेर पडताना दही खाऊन निघायचे.
यामागे लॉजिक असं की उन्हाळ्यात दही खाल्ल्याने पोट थंड रहाते. दह्यात साखर घातलेली असेल तर शरीरात ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राहाते.