2019 नंतर निवडणुका होणार नाहीत, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सामना ऑनलाईन । लखनौ

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजप निवडणुका बंद करेल असा आरोप केलेला असतानाच भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी गेहलोत यांचा आरोप खरा ठरविणारे वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज यांनी 2019 नंतर निवडणुका होणार नाहीत, असे वक्तव्य केलं आहे. उन्नाव येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

‘देशात आता मोदी नावाची त्सुनामी आली आहे. देश जागृत झाला आहे. मला वाटतं की या निवडणुकीनंतर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत. फक्त हीच निवडणूक ज्यात तुम्ही देशासाठी नेतृत्व निवडू शकता’, असे धक्कादायक वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे.