शार्कला ठोसे मारून त्याने केली स्वतःची सुटका

34

सामना ऑनलाईन । कॅनबेरा

शार्कच्या तावडीत सापडणं म्हणजे थेट मृत्युशी गाठ. पण, इंग्लंडच्या एका माणसाने शार्कला ठोसे लगावत स्वतःची सुटका करुन घेतली आहे. या माणसाचं नाव चार्ली फ्राय असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

२५ वर्षीय चार्ली आपल्या मित्रांसोबत ऑस्ट्रेलिया फिरायला गेला होता. तिथे अवोका बीचवर तो समुद्रात पोहायचा आनंद घेत होता. पोहत असताना अचानक त्याला जोरदार धक्का बसला. आपल्या उजव्या हाताला एका शार्क माशाने धडक दिल्याचे त्याच्या लक्षात आले. चार्लीने प्रसंगावधान राखत शार्कच्या तोंडावर ठोसे मारले आणि मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली.

सुदैवाने चार्ली या घटनेतून बचावला आणि सुरक्षित किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर येताक्षणी त्याला जाणवलं की त्याच्या खांद्याला जबरदस्त दुखापत झाली असून रक्तस्राव होत आहे. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर २४ तासांसाठी बीच बंद ठेवण्यात आला. हा शार्क १० फूट लांब असल्याचं बीचच्या लाइफगार्ड्सचं म्हणणं आहे. त्यामुळे तो शार्क किनाऱ्यापासून दूर निघून गेल्याची खात्री झाल्यानंतरच बीच पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या