इथे सात तासांत संपतं वर्ष

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पृथ्वीवर एक वर्ष पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. पण, वैज्ञानिकांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे जो ग्रह अवघ्या सात तासांत एक वर्ष पूर्ण करतो. या ग्रहाचं नाव EPIC 246393474 b असं आहे. Phys.org नामक वेबसाईटने या शोधाची माहिती प्रसिद्ध केली आहे. शोधाची माहिती जाहीर करुन संबंधित शास्त्रज्ञांच्या पथकाने आजवरचा सगळ्यात वेगवान ग्रह शोधून काढल्याचा दावा केला आहे.

वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, केपलर नावाच्या दुर्बिणीने या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ असून इथे वातावरण नाही. विशेष म्हणजे सात तासांमध्ये १ वर्ष पूर्ण करणाऱ्या या ग्रहाचा आकार पृथ्वीहून तीनपटींनी मोठा आहे. या ग्रहाचा भूभाग खडकाळ असून त्यात ७० टक्के लोहखनिजाचा समावेश आहे. अर्थात इथे एक दिवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो, त्याचा शोध अजूनही शास्त्रज्ञ घेत आहेत.