कवठे येमाईत एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त, तीन जणांना अटक

13

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात पोलीस गस्त घालत असताना कवठे येमाई येथे एका वाहनाचा संशय आल्याने पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व त्यांच्या पथकाने या वाहनाची झडती घेतली असता त्यात जुन्या चलनातील पाचशे व हजार रुपये किमतीच्या 1 कोटी 26 हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने शिरूर तालुक्यातील या 3 जणांना या जुन्या चलनी नोटा कमिशनच्या बदल्यात बदलून देण्याचे काम दिले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यातील एकजण आमदाबादचा, दुसरा सविंदणेचा तर तिसरा कर्डेलवाडीचा असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. याप्रकरणी आयकर विभागाला कळविण्यात आले असून या घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या