#MumbaiBridgeCollapse दीड वर्षात तीन पूल दुर्घटनांनी हादरली मुंबई

3

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या दीड वर्षात मुंबई ही तीन मोठ्या पूल दुर्घटनांनी हादरली आहे. गुरुवारी संध्याकाळी सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूलाचा भाग कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे आधीच्या एलफिन्स्टन पूल दुर्घटना व अंधेरी पूल दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

जवळपास दीड वर्षापूर्वी मुंबईतील एलफिनस्टन या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात भर नवरात्रीच्या दिवसात चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे पुलांवरील वाढत्या गर्दीचा व पुलांच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दहा महिन्यानंतर अंधेरी स्थानका जवळील रुळांवरून जाणाऱ्या गोखले पूलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांचा रुळावर पडून मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते.

अंधेरी दुर्घटनेच्या आठ महिन्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पूल दुर्घटनेने हादरली आहे. गुरुवारी संध्याकाळी सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूलाचा भाग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर 36 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या