आरे कॉलनीत तिघा नायजेरियन ड्रग्ज तस्करांना पकडले

6

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षातील कांदिवली युनिटने रविवारी आरे कॉलनीत तिघा नायजेरियन ड्रग्ज तस्करांना कोकेनच्या साठ्यासह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 40 ग्रॅम वजनाचा आणि दोन लाख 40 हजार किमतीचा कोकेन हस्तगत करण्यात आला.

कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, एपीआय सावंत आणि पथक रविवारी उत्तर मुंबई परिसरात गस्त घालत असताना गोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाका परिसरात तीन नायजेरियन तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसले. ते तिघेही टॅक्सीत बसून निघून जाऊ लागल्यानंतर कदम व त्यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर आरे कॉलनीतील युनिट नंबर 8 येथील मातोश्री आरे स्टॉलसमोर या तिघांवर झडप घातली. तिघांची झडती घेतल्यावर त्यांचाकडे 40 ग्रॅमचा कोकेनचा साठा सापडला. तिघांनाही अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या