तीन मुस्लिम धर्मगुरूंना रमजान संपल्यानंतर फाशी; दहशतवाद पसरवल्याचा आरोप

56
suicide

सामना ऑनलाईन । रियाध

आता सौदी अरेबियानेही दहशतवाद मुळासकट उपटून काढण्याचा निश्चय केला आहे. गेल्या वर्षभरात सौदी सरकारने दहशतवाद पसरवणाऱ्या 148 जणांना तर चालू वर्षात तब्बल 37 जणांना फासावर लटकवले असून आता रमजानचा उपवासाचा महिना संपताच तीन मुस्लिम धर्मगुरूंनाही फासावर लटकवले जाणार आहे. या तिघांवरही दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार केल्याचा आरोप आहे.

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शेख सलमान अल अकदाह, आकाद अल कारनी आणि अली अल कुमारी अशी या तिघांची नावे असून त्यांना रमजान संपल्यानंतर फासावर लटकवण्यात येणार आहे. शेख सलमान अल अकदाह हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले मुस्लिम धर्मगुरू आहेत. अल कारनी हे मौलवी व लेखक आहेत तर अल कुमारी हे प्रसिद्ध धर्मप्रसारक आहेत. या तिघांवरही सौदी अरेबियात दहशतवादाचा प्रचार केल्याचे आरोप आहेत. गेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये 37 जणांना फासावर लटकविण्यात आले आहे. या सर्वांवर दहशतवाद पसरविण्याचे आरोप आहेत. सौदी अरेबियात 2018 मध्ये 148 जणांना फासावर लटकविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या